अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी मका व युरिया किट पुरवठा करणे
प्रकल्पा अंतर्गत येणारे लाभार्थ्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. ते पारंपारीक पध्दतीने शेती करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती व आधुनिक शेतीच्या ज्ञानाच्या अभावामुळे ते किटक नाशके, अधुनिक खते/बियाणे यांचा वापर करत नाही. परिणामी उत्पन्नात घट येवुन यांचे आर्थिक नुकसान होते. अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी मका व युरिया किट पुरवठा केल्यास त्यांचा उत्पन्नात वाढ होऊन परिणामी त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढुन जिवनमान उंचवण्यास मदत होईल, या उद्देशाने ही योजना प्रस्तावित करण्यात येत आहे.