एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
गोटूल

गोटूल ही आदिवासी समाज संस्कृतीतील बहुआयामी व्यवस्था आहे. गावाच्या विकासाचे, जत्रा-उत्सवांच्या विधींचे निर्णय तिथे घेतले जातात. गावाचे प्रश्न तिथे मांडले जातात. ते सोडवण्याचे मार्ग शोधले जातात. या अर्थाने गोटूल ही ग्रामसभा आहे, सामाजिक-सांस्कृतिक केंद्र आहे, शिक्षण-प्रशिक्षणाचे साधन आहे, सामूहिक संवादाचे माध्यम आहे, गावातील प्रश्न सोडवण्याचे कोर्टही आहे. गडचिरोली आणि माडिया आदिवासी अशी ओळख सांगताच शहरातील अनेकांचे डोळे लकाकतात. नक्षलवादी, दुर्गमता यापाठोपाठ विषय निघतो तो गोटूलचा. गोंड, माडिया आदिवासींची संस्कृती म्हणजे ‘गोटूल’.आदिवासींसाठी ‘गोटूल’ हे फक्त भौतिक स्ट्रक्चर नाही, तर ती संस्कृती आहे. नाचगाण्यापलीकडे सामुदायिक जीवनपद्धतीचा, सामूहिक निर्णय प्रक्रियेचा एक प्रगत नमुना आहे. मध्य भारतातील गोंड, माडिया, मुरिया या आदिवासी गावांमध्ये गोटूल आहेत. गावाच्या मध्यभागी हे असते. पण गोटूल म्हणजे फक्त गावचे सभागृह नाही, तर सामुदायिक जगण्याचे, सामूहिक निर्णय प्रक्रियेचे आणि लोकसहभागाचे अत्यंत रचनाबद्ध अशी यंत्रणा आहे. वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या एका आदिम संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. गावातील लोक तिथे जमतात, चर्चा करतात, निर्णय घेतात, न्यायनिवाडे करतात, उत्सव साजरे करतात. आदिवासी समाजातील गोटूल ही अत्यंत पवित्र, वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रगत व्यवस्था आहे. ‘गोटूल’ हा शब्द माडिया भाषेतील ‘गोटिंग’ या शब्दावरून तयार झाला. गोटिंग म्हणजे चर्चा करणे. चार लोक जमले की चर्चा तर होतेच. पण ती चर्चा आणि गोटूलमध्ये होणारी चर्चा यात एक महत्त्वाचा गुणात्मक फरक असतो. गोटूलमधील चर्चेतून घेण्यात आलेले निर्णय सामूहिक असतात, ते सगळ्यांना मान्य असतात आणि सगळे जण ते पाळतात. गोटूलमध्ये झालेल्या निर्णयांना आदिवासींमध्ये एक अधिमान्यता असते. त्यात लोकांचा सहभाग आणि खुलेपणा, पारदर्शीपणा असतो. गोटूलमध्ये जे ठरते ते गावातील सर्वांना माहीत असते आणि मान्य असते. तो निर्णय सर्वांवर बंधनकारक असतात. सण-उत्सव साजरे करण्याचे, प्रथापरंपरा पाळण्याचे, पेरण्या-लावण्या ठरवण्याचे निर्णय गोटूलमध्ये घेतले जातात.

कोंजेड
Date : 04-05-2022

कोंजेड गावातील गोटुल

गोटूल ही आदिवासी समाज संस्कृतीतील बहुआयामी व्यवस्था आहे. कोंजेड गावाच्या विकासाचे, जत्रा-उत्सवांच्या विधींचे निर्णय तिथे घेतले जातात. गावाचे प्रश्न तिथे मांडले जातात. ते सोडवण्याचे मार्ग शोधले जातात. या अर्थाने गोटूल ही ग्रामसभा आहे, सामाजिक-सांस्कृतिक केंद्र आहे, शिक्षण-प्रशिक्षणाचे साधन आहे, सामूह

कल्लेड
Date : 30-04-2022

गोटूल ही आदिवासी समाज संस्कृतीतील बहुआयामी व्यवस्था आ

गोटूल ही आदिवासी समाज संस्कृतीतील बहुआयामी व्यवस्था आहे. गावाच्या विकासाचे, जत्रा-उत्सवांच्या विधींचे निर्णय तिथे घेतले जातात. गावाचे प्रश्न तिथे मांडले जातात. ते सोडवण्याचे मार्ग शोधले जातात. या अर्थाने गोटूल ही ग्रामसभा आहे, सामाजिक-सांस्कृतिक केंद्र आहे, शिक्षण-प्रशिक्षणाचे साधन आहे, सामूहिक संवा