एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
प्रकल्प कार्यालयाबद्दल

सदर प्रकल्प कार्यालय तालुका अहेरी, जि. गडचिरोली येथे असून, सदर प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी हे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असतात. या प्रकल्पा अंतर्गत 3 तालुके समाविष्ठ आहे.

ह्या प्रकल्पाअंतर्गत 3 तालुक्यातील आदिवासी बांधवाचे शैक्षणिक व विकासाचे कार्य केले जाते. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी बांधवाना घरकुल, आर्थिक विकासासाठी शेळीपालन, छोट्या व्यवसायांसाठी मोफत अनुदान दिले जाते.

आदिवासी मुले/मुली यांच्यासाठी निवासी आश्रमशाळांची स्थापना करण्यात आली आहे. उच्च शिक्षणासाठी तालुकास्तर व जिल्हास्तरावर वसतीगृह उघडण्यात आलेले आहेत. तसेच परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. आदिवासी बांधवांची संस्कृती टिकवून विविध गांवामध्ये गोटुलची स्थापना करण्यात आलेली आहे.

आदिवासी क्षेत्रात पेसा या कायद्याअंतर्गत आदिवासी बांधवांची विविध पदांवर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती साठी शिफारस केली जाते.

प्रकल्प कार्यालयाचे कार्यक्षेत्र

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम