एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
गोटूल ही आदिवासी समाज संस्कृतीतील बहुआयामी व्यवस्था आहे.
Date : 30-04-2022

गोटूल ही आदिवासी समाज संस्कृतीतील बहुआयामी व्यवस्था आहे. गावाच्या विकासाचे, जत्रा-उत्सवांच्या विधींचे निर्णय तिथे घेतले जातात. गावाचे प्रश्न तिथे मांडले जातात. ते सोडवण्याचे मार्ग शोधले जातात. या अर्थाने गोटूल ही ग्रामसभा आहे, सामाजिक-सांस्कृतिक केंद्र आहे, शिक्षण-प्रशिक्षणाचे साधन आहे, सामूहिक संवादाचे माध्यम आहे, गावातील प्रश्न सोडवण्याचे कोर्टही आहे. गडचिरोली आणि माडिया आदिवासी अशी ओळख सांगताच शहरातील अनेकांचे डोळे लकाकतात.

  • जत्रा-उत्सवांच्या विधींचे निर्णय तिथे घेतले (12/05/2022)



//