एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
ग्रामीण भागामध्ये कृषी गोदाम बांधकाम करणे
  • गडचिरोली जिल्हातील भामरागड व एटापल्ली तालुक्यातील आदिवासी बहुल गावामध्ये आदिवासी शेतकऱ्यांची उत्पादीत केलेल्या शेतमाल (भातपीक) साठवणुकीची योग्य सुविधा नसल्यामुळे शेतकरी योग्य भाव मिळण्याची वाट न पाहता शेतमाल खाजगी भात गिरणीमध्ये किंवा व्यापाऱ्यास विक्री करतात.
  • त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. शेतकरी बऱ्याचदा उत्पादीत केलेला शेतमाल उघडयावर ठेवतात त्यामुळे अवेळी येणार पाऊस व इतर नैसर्गिक घटनांमुळे शेतमालाची प्रत / गुणवत्ता कमी होते.
  • सदर योजनेतुन आवश्यक असलेल्या ग्रामीण भागामध्ये कृषी गोदाम बांधकाम केल्याने शेतकऱ्यांना भात पिक साठवणुक करणेकरीता मदत झालेली आहे.