एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
आदिवासी लाभार्थी/विद्याार्थ्यांना जात प्रमाणपत्र काढणे करीता अर्थसहाय्य करणे

या प्रकल्पातंर्गत येणारे क्षेत्र जंगलव्याप्त व डोंगराळ असल्याने दळण-वळण तसेच माहीती प्रसारण्याचा सुविधांची कमतरता आहे. या भागातील बरेचसे लोक शिक्षणाचा अभावामुळे अज्ञानी असल्यामुळे शासनाचा विविध विभागाकडुन राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच त्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची माहीती त्यांचा पर्यंत पोहचत नाही. तसेच त्या योजनांचा लाभ घेणेकरीता आवश्यक असलेले कागदपत्रे त्यांना मिळत नाहीत त्यामुळे ते शासकिय योजनेपासुन वंचीत राहतात.विशेषता या लाभार्थ्यांना अर्थिक अडचणीमुळे शासकिय योजनेचा लाभ देणेकरीता जातीचा दाखला काढणे करीता अडचण निर्माण होते. सदर लाभार्थी हे जातीचा दाखला काढणेकरिता लागणारी फी ची रक्कम भरण्यास सक्षम नाहित तसेच तहसिलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी नगर पंचायत यांनी सभेत मागणी केलेली आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना जातीचे दाखला काढणेकरीता आर्थिक मदत केल्यास आदिवासी विकास विभागाचा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच इतर विभागाच्या योजनाचा लाभ घेता येईल.