या प्रकल्पा अंतर्गत अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात मोठया प्रमाणात आदिम जमातीचे वास्तव्य आहे. ते प्राथमिक केंद्र व आरोग्य पथक हे फार दूर आहेत.बारमाही दळण वळणाचे साधन नाही.अशा स्थितीत गरोदर मातेची प्रसुती वेळी आवश्यकव्यवस्था शक्य होत नाही.त्यामुळे गावातगतचे प्रा.आ.केंदा्ना प्रसुती कक्षात आवश्यक साहित्य उपलब्ध असल्यास आढळणारे गरोेदर मातामृत्युचे प्रमाण कमी होईल. आरोग्यसेवा उंचावेल. सदर सुविधामुळे गरोदर मातांना त्वरीत लाभ मिळेल बालमृत्युचे प्रमाण कमी होईल.