वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय, वास्तुशात्र इ. व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्याना भारत
सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत देण्यात येणारी निर्वाह भत्ता रक्कम अपुरी पडत असल्याने पुस्तके,निवास, भोजन, स्टेशनरी इ. खर्चासाठी वसतिगृहात व वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीच्या निर्वाह भत्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम या योजनेद्वारें दिली जाते.
शासन निर्णय : क्र. आवगृ- १२०४ / प्र.क्र. १८/का-१२ दि. २४/०८/२००४
लाभार्थ्यांसाठीची अर्हता :
१) विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमात प्रवेशित असावा.
२) विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती धारक असावा.
३) भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेस जी उत्पन्न मर्यादा लागू आहे. तीच मर्यादा या योजनेस लागू राहील.
(रु. २.५० लाख पेक्षा कमी).
४) स्थानिक विद्यार्थी किंवा स्वतःच्या घरीराहणाऱ्या विद्यार्थ्यास सदर योजना लागू नाही.
५) महाविद्यालयाच्या वसतिगृहात किंवा आदिवासी विभागाच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या
राहण्याची सोय होत नसल्यास तसे प्रमाणपत्र संबंधित वसतिगृह अधीक्षकांकडून प्राप्त करून घेणे
आवश्यक राहील.