राज्यातील बेघर किंवा ज्यांची घरे कुडा मातीची आहेत. अशा आदिवासी लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी या विभागाच्या दिनांक 28/03/2013 च्या शासन निर्णयान्वये सन 2012-13 पासुन शबरी आदिवासी घरकुल योजना सुरु करण्यात आलेली आहे.
शासन निर्णय दिनांक 06/01/2016 अन्वये शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागाकरीता शैचालय बांधकामासह प्रति घरकुल 142000/- अनुदान (नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्राकरीता) मंजुर करण्यात आले आहे.
तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना MGNREGA अभिसरनाद्वारे शबरी आदिवासी घरकुल योजनेच्य लाभार्थ्यांना नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी रु. 18240/- अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.