एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

१) परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी लाभलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थांना उच्च शिक्षण घेणे सोपे व्हावे याकरिता दि. ३१/0५/२००५ रोजीच्या शासन निर्णयान्वये परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे.
२) दि. १६/0३/२०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये योजने,अंतर्गत निकषांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
३) प्रस्तुत योजनेंतर्गत दरवर्षी कमाल १० आदिवासी विद्यार्थ्यांची निवड करण्याची तरतूद आहे.
४)व्यवस्थापन, वैद्यकीये अभियांत्रिकी, विज्ञान, कृषी इ. शाखांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते.
५) पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ६.०० लाख. विद्यार्थी हा पुर्ण वेळ नोकरी करीत नसावा.
६) कुटुंबियातील फक्त एकाच अपत्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे.
७) विद्यार्थांनी परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा.
८) अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व विद्यापीठाने निर्धारीत केलेली इतर शुल्क शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येतात.
९)आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्यामार्फत दरवर्षी माहे मे महिन्यात वर्तमानपत्रात जाहिरात देऊन इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात येतात.
१०)प्रस्तुत शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यासाठी सचिव, आदिवासी विकास यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर समितीत आयुक्त, आदिवासी विकास, आयुक्तालय, नाशिक, अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर, संचालक.
११)तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई व संचालक वैद्यकीय शिक्षण संचालनालय, मुंबई हे सदस्य आहेत. शिष्यवृत्ती लाभ मिव्ठविण्यासाठी प्राप्त अर्जाची राज्यस्तरीय छाननी समितीद्वारा पळताळणी होऊन निवड केली जाते व आयुक्तालय स्तरावर शिष्यवृत्ती लाभ मंजुर केला जातो.