सदर योजनेची सुरूवात सन २००६-०७ या शैक्षणिक वर्षापासून झालेली आहे. या योजनेस उच्च व तंत्र
शिक्षण विभागाकडून दरवर्षी नव्याने मंजूरी देण्यात येत होती. तथापि, सन २०१५-१६ पासून सदर
योजना कायम स्वरूपी योजना म्हणून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून आदिवासी
विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना प्रस्तुत योजनेंतर्गत संबंधित वर्षात
शिक्षण शुल्क समिती / प्राधिकरण किंवा परिषदेने निर्धारीत केलेल्या दराप्रमाणे शिक्षण शुल्क व परीक्षा
शुल्काची १००% प्रतिपूर्ती करण्यात येते.
शासन निर्णय : क्र. व्यअप्र-२०१६/प्र.क्र.१२२/का-१२, दि. ३९.०३.२०१६
लाभाथ्यासाठीची अर्हता :
१) याकरिता उत्पन्न मर्यादेची अट नाही.
२) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकरीता शासनाच्या सामायिक प्रवेश परीक्षेद्वारा प्रवेश घेतलेल्या अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्याना लागू राहील.
३) आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाकरीता सामायिक प्रवेश परीक्षेद्वारा प्रवेश घेतलेले, खाजगी
विनाअनुदानित महाविद्यालयाच्या वतीने तसेच असोसिएशन मार्फत घेण्यात येणान्या सामायिक
प्रवेश परीक्षेद्रारा आणि इयत्ता १२ वी च्या गुणांच्या आधारे काही अभ्यासक्रमांकरीता (उदा. नर्सिंग)
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लागू राहील.
४) आरक्षणाचा लाभ न घेता, गुणवत्तेनुसार खुल्या गटातील जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना लागू
राहील.
५) एक किवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण होऊन ए.टी.के.टी. द्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना अनुज्ञेय
राहील.
६) ज्या अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया लागू आहे त्यांना त्या प्रक्रियेद्वारा प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यांना लागू.
७) कृषी व संलग्न अभ्यासक्रमांसाठी. सी.ई.टी. घेत नसल्यास इयत्ता १२ वी च्या गुणांच्या आधारे प्रवेश
घेतलेल्या विद्यार्थ्यांना लागू.
८) व्यवस्थापन कोट्यातील विद्यार्थी तसेच अभिमत विद्यापीठात प्रवेशित विद्यार्थी यांना अनुज्ञेय नाही.