एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

शासन निर्णय क्र. आवगृ-२0१६/प्र.क्र. ८७/का-१२ दि. १५/१०/२०१६

सन २0१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून विभागाच्या कार्यान्वित शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या एकूण २0,000 विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उ्त्ष शिक्षणाकरीता भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्‍कम वितरण करण्याबाबत पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम्‌ योजना सुरू करण्यात आलेली आहे.

सदर योजनेंतर्गत महानगरपालिका विभागीय शहरे आणि जिल्हास्तावरील शै क्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निवास भत्ता, आहार भत्ता, निर्वाह भत्ता तसेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्याकरीता निर्धारीत केलेले अर्थसहाय्य देण्यात येते.

  • विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थ्याने अर्जासोबत जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
  • विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रु. २.५0 लाख पेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल. त्यानुसार योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील.
  • सदरचा विद्यार्थी १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा.
  • विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
  • आदिम जमातीच्या व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ प्राधान्याने देय राहील.
  • शासन निर्णय क्र. आवगृ-२0१६/प्र.क्र.८७/का-१२ दि. २७.११.२०१८

    सन २0१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून तालुका स्तरावरील इ. १२ वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम्‌ योजना या योजनेंतर्गत लाभ देण्यास सुरूवात.

    शासन निर्णय क्र. आवगृ-२0१६/प्र.क्र.८७/का-१२ दि. १६.९.२०१९

    सदर शासन निर्णयान्वये करण्यात आलेल्या सुधारणा खालीलप्रमाणे आहेत:

  • सन २0१९-२0 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १0 वी नंतरच्या दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यवसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी
  • महानगरपालिका / नगरपालिका हद्दीमध्ये आणि महानगरपालिका/नगरपालिका हद्दीपासून 0५ कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात / शिक्षंण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी या योजनेंतर्गत लाभास पात्र राहतील.