एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प    |    अहेरी
आदिवासी भागांमध्ये योजनांची प्रभावी अमलबजावणी करण्याकरीता व्दिभाषीक/संघटक म्हणुन सुशिक्षीत उमेदवाराची मानधनावर नेमणूक करणे

प्रकल्प कार्यक्षेत्रांतर्गत माडीया,गोंडी भाषा बोलणारे आदिवासी लाभार्थी आहेत, तसेच काही प्रमाणात तेलगु बोलणारे लाभार्थी आहेत, लाभार्थी प्रकल्प कार्यालयात आल्यावर तसेच अधिकारी / कर्मचारी प्रत्यक्ष फिल्ड मध्ये गेल्यावर संवाद साधताना भाषेची अडचण निर्माण होते. अशा प्रसंगी व्दिभाषीकांची आवश्यकता भासते. तसेच वेगवेगळया योजनांचे अर्ज गोळा करणे कार्यालयात येणाऱ्या लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देणे. त्यांचेकडुन अर्ज भरुण घेणे इत्यादी कामाकरीता व्दिभाषीक किंवा संघटक यांची गरज भासते.